भिवंडीत पालिका सेवानिवृत्त शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडीत पालिका सेवानिवृत्त शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम
भिवंडीत पालिका सेवानिवृत्त शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

भिवंडीत पालिका सेवानिवृत्त शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम

sakal_logo
By

भिवंडी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी-निजामपूर महापालिका शिक्षण विभागातील सेवानिवृत्त शिक्षक दरवर्षी एकत्र येत असतात. हे निमित्त साधून त्यांनी नुकताच गेट-टुगेदरचा स्तुत्य उपक्रम नारळी तलाव शाळा क्रमांक १९ मध्ये आयोजित केला होता. या कार्यक्रमात सर्व माध्यमातील सुमारे १५० सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिका उत्साहाने सहभागी झाल्‍या होत्या. वयाची ७५ वर्षे पूर्ण झालेले सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षिकासुद्धा यावेळी उपस्थित होते. त्यांना माजी शिक्षण सभापती राजू गाजेंगी, डॉ. प्रतिमा संखे, के. डी. पवार तसेच डॉ. जयानंद केणी यांच्‍या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाबाचे फूल देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. माजी सभापती राजू गाजेंगी यांनी मार्गदर्शनपर भाषणात सर्व शिक्षकांचे, पेन्शनर लोकांचे प्रलंबित प्रश्न लवकरच मार्गी लावण्‍याचे ठोस आश्वासन दिले.