मानखुर्दमध्ये आरोग्य शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मानखुर्दमध्ये आरोग्य शिबिर
मानखुर्दमध्ये आरोग्य शिबिर

मानखुर्दमध्ये आरोग्य शिबिर

sakal_logo
By

मानखुर्द, ता. ६ (बातमीदार) ः मानखुर्दच्या रोमा बंजारा तांडा गृहनिर्माण संस्थेलगत असलेल्या तथागत बुद्ध विहारात रविवारी (ता. ६) आरोग्य शिबिर पार पडले. सावली सेवा फाऊंडेशन, पहल सामाजिक संस्था तसेच जनजागृती विद्यार्थी संघ या स्वयंसेवी संस्थांनी संयुक्तपणे हे आयोजन केले होते. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होत त्याचा लाभ घेतला. ठाणे येथील बावेकर रुग्णालयाच्या पथकाने यामध्ये महत्त्‍वाची भूमिका बजावली. एकूण १७२ नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता. त्यापैकी २० नागरिकांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्याचे पथकातील डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्यावर बावेकर रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. पहल सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी मधुकर पुजारी व सावली सेवा संस्थेचे अध्यक्ष संतोष सुर्वे या आयोजना वेळी उपस्थित होते. तसेच पार्वती चव्हाण, आनंद नाईक, सरोजा सूर्यवंशी, काजल तळवलकर व अनिता यादव हे कार्यकर्ते सहभागी झाले होते.