या मुलांचे पालक कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या मुलांचे पालक कोण?
या मुलांचे पालक कोण?

या मुलांचे पालक कोण?

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ ः पोलिसांना सापडलेली बेवारस मुले बालकल्‍याण समिती ठाणे यांच्‍या जे. जे. ॲक्‍ट २०१५ अंतर्गत दिलेल्‍या आदेशावरून नेरूळ येथील विश्‍वबालक केंद्र, सेक्‍टर १२ येथे दाखल आहेत. यामध्‍ये सोनी (वय आठ महिने) या मुलीला ३ मार्च रोजी तुर्भे पोलिसांनी तुर्भे स्‍टोअर येथील महिलेकडून ताब्‍यात घेतले असून तिला विश्‍वबालक केंद्र येथे दाखल केले आहे. तसेच मनीष (वय १ वर्ष) या मुलाला ७ जुलै रोजी एका महिलेने वाशी पोलिसांकडे दिले आहे. या मुलाची आई त्‍याला या महिलेकडे सोडून गेली होती. त्‍यालाही विश्‍वबालक केंद्र येथे दाखल केले आहे. त्‍याचप्रमाणे आयुष (वय आठ महिने) हा मुलगा ८ सप्‍टेंबर रोजी तुर्भे पोलिसांना एका महिलेसोबत आढळून आला. त्‍यालाही पोलिसांनी विश्‍वबालक केंद्र येथे दाखल केले आहे. या मुलांच्‍या पालकांनी किंवा नातेवाईकांनी पोलिसांशी किंवा विश्‍वबालक केंद्र येथे ०२२ २७७२०७६५, २७७०९०४९ येथे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे. दरम्‍यान, नवघर येथेही सरस्‍वती (वय ५ वर्षे) ही मुलगी २४ मे रोजी विनापालक फिरताना आढळली आहे. तिला नवघर पोलिस स्‍टेशनमार्फत चेंबूरच्‍या घाटला व्हिलेज येथील बालआनंद विशेष दत्तकगृह येथे ठेवण्यात आले आहे. पालकांनी किंवा संबंधित नातेवाईकांनी महिन्‍याभरात संस्‍थेशी किंवा पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.