कल्याणला कँटीनमध्ये घुसली घोरपड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणला कँटीनमध्ये घुसली घोरपड
कल्याणला कँटीनमध्ये घुसली घोरपड

कल्याणला कँटीनमध्ये घुसली घोरपड

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ६ : किरकोळ खाद्यविक्री करणाऱ्या एका कँटीनमध्ये घोरपड अचानक घुसल्याने मालकासह ग्राहकांचा एकच गोंधळ उडाला. कल्याण पश्चिमेतील लाल चौकी परिसरात रविवारी सकाळी ही घटना घडली. विलास झुंजारराव यांची वडापाव, चहा विक्रीच्या कँटीनमध्ये रविवारी सकाळी कामगार काम करत असताना त्यांना किचनच्या अडगळीच्या जागेत काहीतरी दडून बसल्याचे दिसून आले. त्यांनी हुसकावण्याचा प्रयत्न केला असता घोरपड असल्याचे लक्षात आले. तिला पाहताच कामगारांनी दुकानाबाहेर धूम ठोकली. कामगार पळाल्याने त्याला पाहून मालकासह ग्राहकांनीही कँटीन बाहेर पळ काढला. अखेर मालकाने सर्पमित्र दत्ता बोंबे यांना फोन करत या घटनेची माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी जाऊन घोरपडीला पकडून सुरक्षितस्थळी हलविले. ही घोरपड साडेतीन फूट लांबीची असून तिला कल्याण वन अधिकाऱ्यांच्या परवानगीने निसर्गाच्या सानिध्यात सोडून देण्यात आले आहे.