द्रुतगती महामार्गावरील अपघातात २० टक्के घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

द्रुतगती महामार्गावरील अपघातात २० टक्के घट
द्रुतगती महामार्गावरील अपघातात २० टक्के घट

द्रुतगती महामार्गावरील अपघातात २० टक्के घट

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ६ : मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावर सन २०२१-२२ च्या तुलनेत या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत जीवघेण्या अपघातांची आणि मृत्यूची संख्या घटली आहे. राज्य महामार्ग पोलिस विभागाच्या आकडेवारीवरून हे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत वार्षिक जीवघेण्या अपघातांची संख्या बघता सर्वाधिक जीवघेणे अपघात २०१८ मध्ये झाले होते. १०० जीवघेण्या अपघातांमध्ये ११४ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यानंतर कोरोनाच्या निर्बंधांमुळे काही प्रमाणात अपघात कमी झाले असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २० टक्के जीवघेणे अपघात घटले आहेत. शिवाय १५ टक्के मृत्यूसुद्धा घटल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्य महामार्ग पोलिस विभागाकडून द्रुतगती महामार्गावर झालेल्या किरकोळ अपघात, गंभीर अपघात, जीवघेणे अपघात आणि दुखापत न होणाऱ्या अपघातांची नोंद केली जाते. त्याप्रमाणे गेल्या वर्षात वर्षभरात ७१ जीवघेणे अपघात होऊन ८८ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता; तर ५४ गंभीर अपघात होऊन १४६ लोकांना गंभीर दुखापती झाल्या होत्या; तर १६ किरकोळ अपघातामध्ये १८ लोकांना किरकोळ दुखापती झाली; तर ५९ अपघातांमध्ये कोणतीही दुखापत झाली नाही. असे एकूण वर्षभरात २०० अपघात द्रुतगती महामार्गावर झाले होते. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांत जीवघेणे अपघात ५५; तर मृत्यू ६६, गंभीर अपघात ३७ तर ८० गंभीर दुखापती, १० किरकोळ अपघात आणि ११ किरकोळ जखमी आणि दुखापत न झालेले ४६ अपघात असे एकूण १४८ अपघात झाले होते. या तुलनेत या वर्षी याच नऊ महिन्यांत जीवघेणे अपघात ४४; तर मृत्यू ५६, गंभीर अपघात ३७, गंभीर जखमी ७९, किरकोळ अपघात १९, किरकोळ जखमी २२ आणि दुखापत न झालेले ४५ असे एकूण १४५ अपघात झाल्याची माहिती महामार्ग पोलिस प्रशासनाने दिली आहे.