संभाजी भिडेंवरील कारवाई थंडावणार? शिंदे - फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sambhaji Bhide
संभाजी भिडेंवरील कारवाई थंडबस्त्यात?

संभाजी भिडेंवरील कारवाई थंडावणार? शिंदे - फडणवीस सरकारवर प्रश्नचिन्ह

मुंबई : ‘आधी कुंकू लाव, मगच बोलेन’ असे म्हणत साम टीव्हीच्या महिला प्रतिनिधीला प्रतिक्रिया देण्यास नकार देणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडेंविरोधात समाज माध्यमावर जोरदार टीका झाली.

राज्य महिला आयोगानेही भिडे यांना खुलासा करण्याबद्दल नोटीसही पाठवली आहे. एखाद-दुसरा अपवाद वगळता भाजप-शिंदे गटाच्या नेत्यांकडून भिडेंचा निषेध करण्यात आला नाही. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारचा भिडेंसोबतचा सलोखा पाहता भिडे यांचे हेही प्रकरण थंडबस्तात जाण्याची शक्यता आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी भिडे यांना या विधानाबद्दल खुलासा करण्याचे पत्र पाठवले. दरम्यान, संभाजी भिडे यांनी नेहमीप्रमाणे पत्राला उत्तर न दिल्यास महिला आयोग भिडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देऊ शकते. मात्र अशा प्रकारे गुन्हा दाखल केल्यानंतर कारवाईचा चेंडू राज्य सरकारच्या कोर्टात जातो; परंतु सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांचे भिडेंसोबत संबंध पाहता कारवाईची फाइल पुढे सरकणे कठीण असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

महिला आयोग संभाजी भिडे प्रकरणाचा सोमवारी आढावा घेऊन पुढील कारवाईची दिशा ठरवणार आहोत.

- रूपाली चाकणकर, अध्यक्षा, महिला आयोग