अँड्रयू कोलासो यांना गार्डवेल साहित्य पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अँड्रयू कोलासो यांना गार्डवेल साहित्य पुरस्कार
अँड्रयू कोलासो यांना गार्डवेल साहित्य पुरस्कार

अँड्रयू कोलासो यांना गार्डवेल साहित्य पुरस्कार

sakal_logo
By

विरार, ता. ६ (बातमीदार) : ज्येष्ठ साहित्यिक, पत्रकार अ‍ॅन्ड्र्यू कोलासो यांना यावर्षीचा ‘गार्डवेल साहित्य पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. वसई मराठी ख्रिस्ती साहित्य मंडळातर्फे शनिवारी (ता. १२) देवतलाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मराठी ख्रिस्ती समाजीय तेराव्या साहित्य संमेलनात हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे. आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात एप्रिल १९६२ पासून पत्रकारितेस सुरुवात करणाऱ्या कोलासो यांनी पत्रकारितेची ६० वर्षे पूर्ण केली आहेत. मे १९७६ पासून ते ‘जनपरिवार’ साप्ताहिकाचे संस्थापक संपादक म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तसेच जून १९६५ पासून सुरू केलेल्या ‘फादर स्टीफन्स ॲकॅडमी माध्यमिक शाळेचे ते संस्थापक आहेत. वसईत साहित्य उपक्रम राबविणाऱ्या ‘साहित्य जल्लोष’ प्रतिष्ठानचेही ते अध्यक्ष आहेत. कोलासो यांच्या आतापर्यंत ४० कविता, १५ कथा, ३०० हून अधिक लेख प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांना राज्य सरकारचा ‘शि. म. परांजपे पुरस्कार’ लाभला आहे.