पाणी समस्येवर लवकरच तोडगा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाणी समस्येवर लवकरच तोडगा
पाणी समस्येवर लवकरच तोडगा

पाणी समस्येवर लवकरच तोडगा

sakal_logo
By

खारघर, ता. ७ (बातमीदार) : सिडकोच्या पाणीपुरवठा विभागातील उप अभियंत्याने खारघर सेक्टर अकरा परिसरातील कमी दाबाने पाणीपुरवठा होणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीतील सदस्यांची भेट घेऊन पाणी समस्येची माहिती घेतली. यावेळी लवकरात लवकर पाणीप्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
खारघर सेक्टर अकरामधील स्नेहा, अनुसया आचार्य, संकेश्वर, वैभवशाली, महालक्ष्मी, गुडविल बालाजी या गृहनिर्माण सोसायटीत कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याची समस्या रहिवाशांनी माजी नगरसेवक प्रवीण पाटील यांच्याकडे मांडली होती. त्यानुसार सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधून या सोसायटीला भेट देऊन रहिवाशांची पाणी समस्या मार्गी लावण्यास सांगितले होते. सरोदे यांनी सर्व सोसायट्यांना भेट देऊन दैनंदिन होणाऱ्या पाणीपुरवठा, तसेच जलवाहिनी पाहणी केली. तसेच सोसायटीत किती युनिट पाणीपुरवठा होतो याची नोंद घेण्यास सांगितले. यावेळी सिडको अधिकाऱ्यांनी पाणीप्रश्न सोडवला जाईल, असे आश्वासन दिले आहे.