आळंदी दिंडी पदयात्रेला रविवारपासून सुरुवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आळंदी दिंडी पदयात्रेला रविवारपासून सुरुवात
आळंदी दिंडी पदयात्रेला रविवारपासून सुरुवात

आळंदी दिंडी पदयात्रेला रविवारपासून सुरुवात

sakal_logo
By

आळंदी दिंडी पदयात्रा सोहळा
पेण (बातमीदार) : श्री संत सेवा मंडळ पेणतर्फे आळंदी दिंडी पदयात्रा १३ ते २२ नोव्हेंबरपर्यंत काढण्यात येणार आहे. ही पदयात्रा हभप दिगंबर महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रस्टी अध्यक्ष हभप शंकर मानकवळे आणि हभप मिथीन तुकाराम नावले यांच्या अध्यक्षतेखाली आळंदी रविवारी (ता. १३) सकाळी ११ वाजता संत सेवा मंडळ कार्यालयापासून सुरू होणार आहे. याप्रसंगी हभप नामदेव डोंबाळे यांच्या हस्ते माऊलीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. तर हभप गणेश गायकर यांच्या हस्ते ‌विण्याला पुष्पहार व नगरसेवक पांडुरंग जाधव यांच्या हस्ते रथाला पुष्पहार घालण्यात येणार आहे. राजू पीछीका यांच्या हस्ते आलेल्या भाविकांचे स्वागत करून दिंडी मार्गस्थ होईल. दिंडीत हभप धर्माधारसे पाच किलो वजनाचा झेंडा खांद्यावर घेऊन सामील होणार आहेत. तसेच पदयात्रेत भजन प्रवचन हरिपाठ कीर्तन, काकडा भूपाळी कार्यक्रम रोज होतील.