खारघर हिल टाऊनशिपच्या हालचालींना वेग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खारघर हिल टाऊनशिपच्या हालचालींना वेग
खारघर हिल टाऊनशिपच्या हालचालींना वेग

खारघर हिल टाऊनशिपच्या हालचालींना वेग

sakal_logo
By

खारघर, ता. ७ (बातमीदार) : सिडकोकडून खारघर टेकडीवर १०६ हेक्टर जागेवर खारघर हिल टाऊनशिप उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. याच अनुषंगाने सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी शनिवारी या भागाची पाहणी केली आहे. त्यामुळे सिडकोच्या प्रस्तावित गृहप्रकल्पाच्या हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे.
वन विभागाच्या सहकार्याने नैसर्गिक संपत्ती जोपासण्याबरोबर वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्यासाठी सिडकोने पनवेल आणि ठाणे वन विभागासह गेल्या सात वर्षांत खारघर टेकडीवर विविध झाडांची लागवड केली आहे. अशातच सिडकोकडून खारघर हिलवर १०६ हेक्टर निवासी कमर्शियल टाऊनशिप उभारण्याचा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पात निवासी इमारती, बंगले, हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स आणि विक्रीसाठी व्यावसायिक भूखंडांचा समावेश असणार आहे. याच अनुषंगाने सिडको अधिकाऱ्यांनी शनिवारी (ता. ५) सिडको व्यवस्थापकीय संचालकांनी सिडको अधिकारी आणि बाहेरून आलेल्या उद्योजकांसमवेत खारघर टेकडीवर असलेल्या फणसवाडी, चाफेवाडी पाड्यालगतच्या परिसराची पाहणी केली आहे. त्यामुळे सिडकोच्या गृहप्रकल्प होण्याच्या हालचालींनी वेग घेतला आल्याची चर्चा खारघरकरांमध्ये आहे. दरम्यान, याविषयी सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काहीही माहिती नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
़़़़़़़़़़़़़-----------------------------------
दौऱ्याविषयी अधिकारी अनभिज्ञ
सिडकोच्या खारघर टेकडीवर पाहणीसाठी उद्योजक हेलिकॉप्टरने येणार असल्यामुळे सिडकोच्या खारघर कार्पोरट पार्कच्या मोकळ्या जागेत हेलिपॅड उभारण्यात आले होते. येथे उतरून सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक, सिडको अधिकाऱ्यांनी मोटारीने खारघरपर्यंत प्रवास करून पाहणी केली. विशेष म्हणजे, या पाहणी दौऱ्याविषयी सिडकोच्या खारघरच्या विभागीय अधिकाऱ्यांनादेखील माहिती देण्यात आली नसल्याने विविध चर्चांना उधाण आले आहे.