अनधिकृत बांधकामे, व्यवसायावर आळा घाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अनधिकृत बांधकामे, व्यवसायावर आळा घाला
अनधिकृत बांधकामे, व्यवसायावर आळा घाला

अनधिकृत बांधकामे, व्यवसायावर आळा घाला

sakal_logo
By

कल्याण, ता. ७ (बातमीदार) : सामान्य जनतेचे कररूपी कोट्यवधी रुपये खर्च करूनदेखील कल्याण शहर स्मार्ट होण्याऐवजी विदरूप होत चालले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटीच्या कामापेक्षाही अनधिकृत बांधकामे व अनधिकृतपणे थाटलेल्या व्यवसायाला महापालिकेचे काही अधिकारी प्रोत्साहन देत आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी सचिव व प्रदेश प्रतिनिधी नोवेल साळवे यांनी एका निवेदनाद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. तसेच या तक्रार निवेदनाची प्रत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार व महापालिका आयुक्तांना दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत स्मार्ट सिटीच्या कामापेक्षाही जास्त जोरात अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृतपणे चालणाऱ्या व्यवसायाबद्दल नोवेल साळवे यांनी वेळोवेळी राज्य सरकार आणि कल्याण महापालिका प्रशासनाकडे तक्रार करूनदेखील कुठलीच कार्यवाही होत नसल्‍याचे दिसून आले. त्यामुळे २८ नोव्हेंबर रोजी पुन्हा एक तक्रार निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते व महापालिका आयुक्त यांना दिले आहे. १५ दिवसांत जर सर्व अनधिकृत बांधकामे व अनधिकृतपणे थाटलेले व्यवसाय निष्कासित केले गेले नाहीत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा या पत्रातून नोवेल साळवे यांनी दिला आहे.