भिवंडी भागात भात कापणीची धांदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिवंडी भागात भात कापणीची धांदल
भिवंडी भागात भात कापणीची धांदल

भिवंडी भागात भात कापणीची धांदल

sakal_logo
By

वज्रेश्वरी, ता. ७ (बातमीदार) : भिवंडी ग्रामीण भागात सर्वत्र भात कापणीला जोमाने सुरुवात झाली आहे. कापणीनंतर पावसाच्या भीतीमुळे लगेचच घाईघाईने झोडणीही करताना शेतकरी दिसत आहेत. दिवाळीच्या आधी परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या भात पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले होते. सध्या हवामान खात्याने पावसाचा अंदाज दिलेला नसल्याने व सध्या कडक ऊन पडत असल्याने शेतकऱ्यांनी जोमाने कापणीला सुरुवात केली आहे.
हळव्या वाणातील भात पिकांबरोबरच निमगरवी वाणातीतील सर्व भातपिके कापण्यास तयार झाल्याने सर्वच शेतकरी कापणीला लागले आहेत. भात कापणी करण्यासाठी स्थानिक मजूर उपलब्ध होत नसल्याने नाशिक, त्र्यंबकेश्वर या भागातून काही शेतकऱ्यांनी मजूर आणले आहेत; तर बहुतांशी शेतकरी मशीनच्या साह्याने भात कापणी करताना दिसत आहेत. शेतामध्ये चिखल नसेल तसेच उभे भातपीक असेल तर या मशिनद्वारे भातपीक कापण्यासाठी शेतकऱ्यांना एक चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. ३५० ते ४०० रुपये प्रतितास या मशिनचा दर असून दिवसभरात १५ ते २० मजुरांइतके या मशिनद्वारे काम होत असल्याने शेतकऱ्यांनी या मशिनला प्राधान्य दिले आहे.