खर्डी हरिनाम सप्ताहाच्या अध्यक्षपदी किसन विशे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खर्डी हरिनाम सप्ताहाच्या अध्यक्षपदी किसन विशे
खर्डी हरिनाम सप्ताहाच्या अध्यक्षपदी किसन विशे

खर्डी हरिनाम सप्ताहाच्या अध्यक्षपदी किसन विशे

sakal_logo
By

खर्डी, ता. ७ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील खर्डी येथे गेल्या ४६ वर्षांपासून गीता जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. या वर्षी होणाऱ्या सप्ताहाच्या कार्यकारिणीची निवड करण्यासाठी दळखण येथील हनुमान मंदिरात परिसरातील वारकरी, समाजसेवक, दानशूर, शेतकरी, व्यापारी यांच्यासह सर्व धार्मिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. यावेळी सप्ताहाच्या अध्यक्षपदी किसन विशे, उपाध्यक्षपदी नामदेव लखा सदगीर, सचिवपदी भागवत मांजे, सहसचिव अशोक हरड, खजिनदारपदी बाळू गायकर व जयवंत सरखोत, सहखजिनदार भरत म्हसकर, स्वागताध्यक्ष तुकाराम सरखोत व कार्याध्यक्ष उद्धव सरखोत यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.