आयुक्तालयात ९९६ पोलिस शिपायासाठी भरती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयुक्तालयात ९९६ पोलिस शिपायासाठी भरती
आयुक्तालयात ९९६ पोलिस शिपायासाठी भरती

आयुक्तालयात ९९६ पोलिस शिपायासाठी भरती

sakal_logo
By

नालासोपारा, ता ७ (बातमीदार) : मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालय हद्दीतील तरुणांना पोलिस भरतीची सुवर्ण संधी निर्माण झाली आहे. आयुक्तालय स्थापनेनंतर पहिल्यांदाच ९९६ पोलिस शिपाई पदाकरिता भरती होणार आहे. याबाबत पोलिस आयुक्तालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलिस आयुक्तालयामध्ये होणाऱ्या ९९६ पोलिस शिपायांकरिता होणाऱ्या भरतीमध्ये ९८६ पोलिस शिपाई, तर १० चालक पोलिस शिपायांसाठी ही भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेतील आवेदन पत्र संगणकीय प्रणालीद्वारे ९ ते ३० नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारण्यात येणार आहेत. हे आवेदन पत्र भरण्यासाठी आणि या भरती प्रक्रियेची माहिती policerecruitment२०२२.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर आहे.