‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ रहित करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ रहित करण्याची मागणी
‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ रहित करण्याची मागणी

‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ रहित करण्याची मागणी

sakal_logo
By

मुंबादेवी, ता. ७ (बातमीदार) ः हलाल प्रमाणपत्र आणि हलाल उत्पादनांची विक्री यातून आतंकवादी कारवायांसाठी अर्थपुरवठा होत असल्याचे पुरावे समोर येत असल्यामुळे ‘इंटरनॅशनल हलाल शो इंडिया’ला हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी तीव्र विरोध केला आहे. दरम्‍यान, मुंबई येथील इस्लामिक जिमखाना, मरीन लाईन्स येथे १२ आणि १३ नोव्हेंबर या दिवशी होणारा हा कार्यक्रम रद्द करण्याची मागणी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली असून या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी ‘हलाल सक्तीविरोधी कृती समिती’ची स्थापना केली आहे. याबाबत प्रसंगी रस्त्यावर येऊन तीव्र विरोध करणार असल्‍याचे सक्तीविरोधी कृती समितीचे डॉ. उदय धुरी यांनी म्हटले आहे.
दादर, घाटकोपर आणि धारावी या ठिकाणी हलाल सक्तीविरोधी कृती समितीने बैठका घेऊन हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पोलिस आयुक्तांना निवेदन, आंदोलने, भव्य मोर्चा, सोशल मीडियाद्वारे जनप्रबोधन आदी माध्यमांद्वारे या ‘इंटरनॅशनल हलाल शो’ला जोरदार विरोध करण्याचा निर्धार केला आहे.
याच विषयाला अनुसरून कल्याण रेल्वे स्थानकाजवळ हलाल सक्तीविरोधी कृती समितीने आंदोलन करून हा ‘इंटरनॅशनल हलाल शो’ रद्द करण्याची मागणी केली. या वेळी पोलिस आणि शासनाला देण्यात येणाऱ्या निवेदनावर लोकांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या. भारत सरकारच्या अधिकृत ‘FSSAI’ आणि ‘FDA’ या संस्था उत्पादनांचे प्रमाणीकरण करत असताना वेगळ्या ‘हलाल प्रमाणीकरणा’ची गरजच काय, असा प्रश्न या वेळी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या प्रतिनिधींकडून उपस्थित करण्यात आला.