पदपथावरील पेव्हर ब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पदपथावरील पेव्हर ब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त
पदपथावरील पेव्हर ब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त

पदपथावरील पेव्हर ब्लॉकमुळे प्रवासी त्रस्त

sakal_logo
By

चेंबूर, ता. ७ (बातमीदार) ः चेंबूर रेल्वेस्थानकाच्‍या जवळील एन. जी. आचार्य मार्ग व अन्य पदपथांवर पालिका ठेकेदारातर्फे पेव्हर ब्लॉक बसवण्याचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. मात्र पेव्हर ब्लॉक वेळेत बसवण्यात येत नसल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे.
पालिका ठेकेदारामार्फत मुंबई उपनगरातील पदपथांवरील सर्व जुने पेव्हर ब्लॉक काढून नवीन बसवण्याचे काम सुरू आहे. याच पदपथांवर फेरीवाले आपले धंदे लावून पदपथ अडवीत आहेत. ठेकेदाराने काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक काढून ढिगारे करून ठेवले आहेत. हे ढिगारे उचलून घेऊन जाण्यास दिरंगाई होत असल्याने प्रवाशांना रस्त्यावरून मार्ग काढावा लागत आहे. पालिकेचा ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
या मार्गावर दिवसभर वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात चालू असते. पदपथांची दुरवस्था, फेरीवाल्‍यांचे अतिक्रमण व पेव्हर ब्लॉकचा काढून ठेवल्याने त्‍याचा त्रास ज्‍येष्ठ नागरिक, गरोदर महिला, अपंग व्यक्तींना होत आहे. पदपथांवर लवकरात लवकर पेव्हर ब्लॉक बसवण्यात यावेत, तसेच फेरीवाल्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.