मुंब्र्यात आत्मनिर्भर कर्ज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुंब्र्यात आत्मनिर्भर कर्ज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंब्र्यात आत्मनिर्भर कर्ज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंब्र्यात आत्मनिर्भर कर्ज योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

कळवा, ता. ७ (बातमीदार) : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब व घरेलू कामगारांसाठी केंद्र सरकारच्या वतीने सुरू केलेल्या आत्मनिर्भर कर्ज योजनेला मुंब्र्यात मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. समाजसेवक रेहान पित्तल यांनी रशीद कंपाऊंड येथे सुरू केलेल्या केंद्रात गेल्या सात ते आठ दिवसांत हजारो फेरीवाले, घरेलू कामगार व झोपडपट्टीतील नागरिकांनी अर्ज भरले आहेत. या योजनेतून १० ते २० हजार रुपयांचा राष्ट्रीय बँकेतून कर्ज पुरवठा होणार आहे. हे कर्ज विनाव्याज असल्याने लाभार्थीला वर्षभरासाठी दर महिन्‍याला ९०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. लाभार्थींच्या खात्यात एकदाच पैसे जमा होणार असल्याने व पूर्ण कर्ज भरल्यावर सवलत मिळणार असल्याने गरीब फेरीवाले व गरीब कष्टकरी महिला या योजनेच्या कर्जासाठी गर्दी करीत आहेत. मुंब्र्यात रशीद कंपाऊंड, अल्मास कॉलनी, बेहरी पाडा अशा चार ठिकाणी हा कर्ज मेळावा सुरू असून तो महिनाभर सुरू राहणार असल्याचे रेहान पित्तल यांनी सांगितले.