नालासोपाऱ्यात रुचकर खाद्यपदार्थांना खमंग प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नालासोपाऱ्यात रुचकर खाद्यपदार्थांना खमंग प्रतिसाद
नालासोपाऱ्यात रुचकर खाद्यपदार्थांना खमंग प्रतिसाद

नालासोपाऱ्यात रुचकर खाद्यपदार्थांना खमंग प्रतिसाद

sakal_logo
By

वसई, ता. ७ (बातमीदार) : गृहिणी या आपल्या खाद्यकृतीतून कुटुंबीयांचे मन जिंकत असतात. मात्र त्यांना व्यासपीठ मिळाल्याने रुचकर, आकर्षक सजावट करण्यास महिलांची लगबग नालासोपाऱ्यात पाहावयास मिळाली. या गृहिणींनी एकापेक्षा एक पाककृती सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
नालासोपारा येथे गेली २२ वर्षे ‘बाई मी सुगरण’ या पाककला स्पर्धेचे आयोजन माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे. यंदाही तुळिंज येथील केएमपीडी शाळेत ही पाककला स्पर्धा पार पडली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना उपनेत्या, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, शिवसेना उपनेत्या निता बिर्जे व माजी जिल्हाप्रमुख शिरीष चव्हाण, गायिका श्वेता दांडेकर यांनी उपस्थित राहून स्पर्धक गृहिणींनी तयार केलेल्या रुचकर, आकर्षक सजावट पाककृतींची चव चाखून कौतुक केले. शाकाहारी व मांसाहारी विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करण्यासाठी व सजावट उत्कृष्ट असावी म्हणून महिलांनी प्रयत्न केले.
सेनेचे जिल्हाप्रमुख पंकज देशमुख, तालुकाप्रमुख स्वप्नील बांदेकर, राजाराम बाबर, उप तालुकाप्रमुख आनंद घरत, शहरप्रमुख प्रदीप सावंत, शहर संघटक रेश्मा सावंत आदींनी या स्पर्धेला भेट दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका संघटक प्रभा सुर्वे, उपशहर संघटक रुचिता विश्वासराव यांनी केले. पाककला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपशहर संघटक भारती गावडे, भाग्यश्री वैद्य, शिल्पा वालकर, संगीता मालुसरे आदींनी मेहनत घेतली.
------------------
स्पर्धेचा निकाल
शाकाहारी पदार्थ : गायत्री शिगवण (प्रथम), सानवी चाळके (द्वितीय), आरोही घाडी (तृतीय)
मांसाहारी पदार्थ : वैशाली पालव (प्रथम), वर्षा मोहिते (द्वितीय), शिल्पा शिंदे (तृतीय)
उत्कृष्ट सजावट : सुषमा शिंदे (प्रथम), प्रणिता पवार (द्वितीय), प्राची नेवरेकर (तृतीय)