कासा बाजारपेठेत मोबाईल दुकानांत चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कासा बाजारपेठेत मोबाईल दुकानांत चोरी
कासा बाजारपेठेत मोबाईल दुकानांत चोरी

कासा बाजारपेठेत मोबाईल दुकानांत चोरी

sakal_logo
By

कासा, ता. ७ (बातमीदार) : डहाणू-नाशिक राज्य मार्गावरील कासा बाजारपेठेत एका मोबाईल दुकानात सोमवारी मध्यरात्री चोरी झाली. यात चोरटे शटर उचकटून आत शिरले आणि दुकानातील टीव्ही, लॅपटॉप, मोबार्इल चोरी करून पळाले, पण गस्तीवरील पोलिसांना संशय आल्याने चोरट्यांनी चोरीचा मुद्देमाल आणि रिक्षा टाकून जंगलात पळ काढला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी कासा बाजारपेठेत असणाऱ्या दोस्ती कम्युनिकेशन या मोबार्इल दुकानासह इतर दुकानांसमोरील दिवे बंद केले. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत चित्रण होऊ नये यासाठी ते दुसऱ्या बाजूला फिरवले. त्यानंतर जुनी कॉट आडोशाला ठेवून शटर उचकटून दुकानातून टीव्ही, लॅपटॉप, मोबार्इल असा ऐवज लंपास केला, पण चोरी करतानाचा व्हिडीओ आतील सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाला आहे, पण चोरट्यांनी तोंडावर कापड बांधले होते. त्यानंतर हे चोरटे नंबर नसलेल्या जुन्या रिक्षातून पसार झाले. चोरटे पसार होत असताना गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना या रिक्षाचा संशय आला. त्यांनी या रिक्षाला थांवण्यासाठी सांगितले, पण चोरट्यांनी रिक्षा पळवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी रिक्षा वेगात नेत सूर्यानगर कवडास बाजूच्या रस्त्यावर उभी करून चोरटे जंगलात पसार झाले आहेत.