वाशी खाडीत अज्ञाताचा मृतदेह | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाशी खाडीत अज्ञाताचा मृतदेह
वाशी खाडीत अज्ञाताचा मृतदेह

वाशी खाडीत अज्ञाताचा मृतदेह

sakal_logo
By

नवी मुंबई (वार्ताहर) : वाशी खाडीमध्ये रविवारी सकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह दुसऱ्या खाडीतून वाहून आला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वाशीतील जागृतेश्वर मंदिराच्या पाठीमागील भागात खाडीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळून आला होता. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढला. मृत व्यक्तीचे वय अंदाजे २५ ते ३० वयोगटातील असून त्याच्या अंगावर काळी कॉटन पॅन्ट आहे. कुजलेल्या अवस्थेतील ही व्यक्ती दोन ते तीन दिवसांपूर्वी दुसरीकडून भरतीदरम्यान या ठिकाणी वाहून आली असावी, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे परिसरातून बेपत्ता झालेल्या व्यक्तींबाबत माहिती घेण्यात येत आहे.