‘जी-२०’ संकेतस्थळाचे आज अनावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘जी-२०’ संकेतस्थळाचे आज अनावरण
‘जी-२०’ संकेतस्थळाचे आज अनावरण

‘जी-२०’ संकेतस्थळाचे आज अनावरण

sakal_logo
By

नवी दिल्ली, ता. ७ : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या (ता. ८) सायंकाळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ‘जी २०’ अध्यक्षांचा लोगो, थीम आणि संकेतस्थळाचे अनावरण करणार आहेत. जी-२० चे अध्यक्षपद भारताला आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवर जागतिक कार्यक्रमात योगदान देण्याची संधी देईल, असे परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आले. १ डिसेंबर २०२२ पासून भारत इंडोनेशियाकडून जी २० चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे. जी २० किंवा २० देशांचा समूह हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा आंतरराष्ट्रीय मंच आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन संघातील देशांचा समावेश आहे.