त्रिकुटाकडून तरुणाला बेदम मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

त्रिकुटाकडून तरुणाला बेदम मारहाण
त्रिकुटाकडून तरुणाला बेदम मारहाण

त्रिकुटाकडून तरुणाला बेदम मारहाण

sakal_logo
By

नवी मुंबई, ता. ७ (वार्ताहर) : कोपरखैरणे येथून दुचाकीवरून मुंब्रा येथे जाणाऱ्या तरुणाला तिघा लुटारूंनी बांबूने मारहाण केल्याची घटना महापे चेकपोस्टजवळ घडली आहे. या लुटारूंच्या मारहाणीत तो जखमी झाला असून त्याच्या तक्रारीवरून तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

मुंब्रा येथे राहणारा जुनेद अहमद मसूद इक्बाल (वय ३०) हा २ नोव्हेंबर रोजी सायंकाळी कंपनीच्या कामासाठी कोपरखैरणेमध्ये आला होता. त्यानंतर तो सायंकाळी मोटरसायकलने घरी जात असताना महापे तपासणी नाक्याच्या पुढे काही अंतर गेला असता त्याला फोन आल्याने तो रस्त्याच्या बाजूला मोबाईलवर बोलण्यासाठी उभा राहिला. याच वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका लुटारूने त्याच्या हातातील मोबाईल फोन खेचून झुडपात पलायन केले. या वेळी जुनेददेखील त्याला पकडण्यासाठी त्याच्या मागे गेला. या वेळी लुटारू व त्याच्या दोन साथीदारांनी जुनेदला पकडून बांबूने मारहाण केली. तसेच त्याचा मोबाईल फोन, घड्याळ व इतर सामान लुटून अंधारात पलायन केले.