वांद्र्यातील अपहृत मुलीची गुन्हे शाखेकडून सुटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वांद्र्यातील अपहृत मुलीची 
गुन्हे शाखेकडून सुटका
वांद्र्यातील अपहृत मुलीची गुन्हे शाखेकडून सुटका

वांद्र्यातील अपहृत मुलीची गुन्हे शाखेकडून सुटका

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : वांद्रे येथून अपहरण झालेल्या एका १४ वर्षीय मुलीची अवघ्या काही तासांत सुटका करण्यात पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश मिळाले. सुटका करण्यात आलेली ही मुलगी एका व्यावसायिकाची मुलगी असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, याप्रकरणी एका १८ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
वांद्रे येथून रविवारी (ता. ६) पहाटेच्या सुमारास १४ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती. तिच्या कुटुंबीयांनी वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर शोधासाठी पोलिस आणि गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परिसरातील सीसी टीव्हीची पाहणी केली. त्यानुसार एका फुटेजमध्ये एक तरुण पीडित मुलीला सोबत नेत असल्याचे दिसले. त्यानुसार तपास केला असता सदर मुलगी दहिसरला असल्याची माहिती मिळाली आणि माग काढत तिची सुटका केली. याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५३ (अपहरण), ३५४ (महिलेवर अत्याचार किंवा गुन्हेगारी बळजबरी) आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यांपासून संरक्षण कायद्यांतर्गत वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला अटक करण्यात आली असून याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.