रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार
रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

रेल्वेच्या १० कर्मचाऱ्यांना महाव्यवस्थापक संरक्षा पुरस्कार

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता. ७ : सतर्कता बाळगून अनुचित घटना टाळणाऱ्या १० रेल्वे कर्मचाऱ्यांचा महाव्यवस्थापकांकडून ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ आणि सोलापूर विभागातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे सोमवारी (ता. ७) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. पुरस्कारामध्ये पदक, प्रशंसा प्रमाणपत्र, अनुकरणीय सुरक्षा कार्याचे प्रशस्तिपत्रक आणि रोख दोन हजार आदींचा समावेश आहे.

मुंबई विभागातील ट्रॅक मेंटेनर गुड्डू कुमार ४ ऑक्टोबरला भिवपुरी-कर्जत विभागात पेट्रोलिंग करत असताना त्यांना रुळाला अनेक ठिकाणी तडा गेल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिल्याने दुर्घटना टळली. मुंबई विभागातील इलेक्ट्रिकल सिग्नल मेंटेनर आशीष लोंढे १ ऑक्टोबरला कर्तव्यावर असताना दादर-कुर्ला विभागात १३/२२७ येथे रुळाला तडा गेल्याचे दिसले. त्यांनी ताबडतोब सिग्नल व दूरसंचार नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. यासह पुणे विभागातील उप स्टेशन व्यवस्थापक प्रशांत गरूड, तंत्रज्ञ प्रमोद देविदास, भुसावळ विभागातील ट्रॅक मेंटेनर राज कुमार डोमन, उप स्टेशन मॅनेजर विवेक कुशल प्रकाश, नागपूर विभागातील सहाय्यक लोको पायलट शीतल चव्हाण, ट्रॅक मेंटेनर विनोद दयाराम आणि सोलापूर विभागातील उप स्टेशन मॅनेजर उज्ज्वल विश्वास, ट्रॅक मेंटेनर नागनाथ कुणाळे यांनीही कर्तव्यावर असताना सतर्कता बाळगत दुर्घटना टाळण्यास हातभार लावला.