पश्चिम रेल्वेचा पुन्हा खोळंबा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पश्चिम रेल्वेचा पुन्हा खोळंबा
पश्चिम रेल्वेचा पुन्हा खोळंबा

पश्चिम रेल्वेचा पुन्हा खोळंबा

sakal_logo
By

मुंबई, ता. ७ : पश्चिम रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेतील बिघाडामुळे या मार्गावरील लोकल वाहतूक वारंवार ठप्प पडण्याच्या घटना घडत आहेत. सोमवारीही वैतरणा ते विरार स्थानकांदरम्यान सकाळी ५.४७ वाजण्याच्या सुमारास सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे अप जलद मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळित झाली. त्यामुळे उशिराने धावत असलेल्या लोकलमुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळी कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.
पश्चिम रेल्वे मार्गावर सोमवारी सकाळी ५.४७ वाजता वैतरणा ते विरारदरम्यान अप जलद मार्गावरील सिग्नल यंत्रणेत झालेल्या बिघाडामुळे लोकल वाहतुकीचे तीन-तेरा वाजले. अनेक लोकलचा खोळंबा झाला. त्यानंतर सकाळी ६ वाजून ३० मिनिटांनी सिग्नल यंत्रणा पूर्ववत केल्यानंतर लोकल वाहतूक सुरू झाली, परंतु या घटनेमुळे सकाळी ११ वाजेपर्यंत या मार्गावरील लोकल सेवा १५ ते २० मिनिटे आणि लांब पल्ल्याच्या गाड्या २० मिनिटांनी उशिराने धावत होत्या.