दशावतार नाटकाला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दशावतार नाटकाला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
दशावतार नाटकाला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

दशावतार नाटकाला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

दिवा, ता. ८ (बातमीदार) : ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, कोकण पदवीधर आमदार व ठाणे शहर जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पक्ष दिवा शहर व सिंधुदुर्ग रहिवासी संघ, बेडेकर नगर, दिवा आयोजित दशावतार नाटकाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत गर्दी केली होती.
ओम वीरभद्र दशावतार नाट्य मंडळ, भांडुप यांचे पौराणिक दशावतार नाटक ‘देव झाला डफली वाला’ या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी भारतीय जनता पक्षाचे आयोजक दिवा शहर मंडळ अध्यक्ष रोहिदास मुंडे, महिला मंडळ अध्यक्षा ज्योती पाटील, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष नरेश पवार, कल्पना पाटील व गणेश नेवगे, उमेश घोगळे, सिंधुदुर्ग रहिवासी संघ बेडेकर नगर यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी व्यासपीठावर प्रिया ठाकूर, विनोद भगत, ठाणे जिल्हा कार्यकारिणी सदस्य विजय भोईर, अशोक पाटील, अंकुश मढवी, सरचिटणीस समीर चव्हाण, युवराज यादव, सचिन भोईर, रोशन भगत, जयदीप भोईर उपस्थित होते.