आमदार कथोरे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार कथोरे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण
आमदार कथोरे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण

आमदार कथोरे यांच्या हस्ते रूग्णवाहिकेचे लोकार्पण

sakal_logo
By

सरळगाव, ता. ८ (बातमीदार) : माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या सावर्णे गाव व परिसरासाठी आलेल्या रुग्णवाहिकेचे आमदार कथोरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. सावर्णे गाव व परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यास रुग्णाला टोकावडे, मुरबाड, कल्याण आदी ठिकाणी उपचारासाठी न्यावे लागते. अनेक वेळा रुग्णाला रात्रीच्या वेळी गरज निर्माण झाल्यास वाहनाची व्यवस्था होत नसल्याने उपचारासाठी नेण्यासाठी मोठी अडचण निर्माण होत होती. ही अडचण लक्षात घेऊन या परिसरासाठी रुग्णवाहिका मिळावी म्हणून सावर्णे गावचे सुपुत्र व ठाणे येथे तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले युवराज बांगर यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश मिळाले असून मिळालेल्या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी अनिल घरत, गोविंद भला, माजी सभापती दीपक पवार, सीमा घरत व ग्रामस्थ उपस्थित होते.