खोकाटेवाडी रस्ताकामाचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खोकाटेवाडी रस्ताकामाचा शुभारंभ
खोकाटेवाडी रस्ताकामाचा शुभारंभ

खोकाटेवाडी रस्ताकामाचा शुभारंभ

sakal_logo
By

मुरबाड, ता. ८ (बातमीदार) : मुरबाड तालुक्यातील सासणे ग्रामपंचायत हद्दीतील खोकाटे वाडीला जाण्यासाठी रस्ता तयार करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी दिली. हा रस्ता तयार करण्यात काही अडचणी होत्या; परंतु आता तेथे जाण्यासाठी नव्‍याने रस्ता होणार आहे.
खोकाटे वाडीला जाण्यासाठी रस्ता नसल्याने तेथील ग्रामस्थांचे हाल होत आहेत. या वाडीला जाण्यासाठी आतापर्यंत रस्ताच नसल्याने तेथे राहणाऱ्या आदिवासींना सुमारे तीन किलोमीटर लांब पायपीट करावी लागत आहे. आजारी रुग्ण, गर्भवतींना सासणे गावापर्यंत पोहचण्‍यासाठी त्रास होत आहे. ठाणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी नुकतीच या वाडीला भेट दिली व रस्ता तयार करण्यात येईल, असे आश्वासन दिले. त्‍यानंतर या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
--------------------------
फोटो ओळी
मुरबाड : तालुक्यातील सासणे ग्रामपंचायत हद्दीतील खोकटेवाडी जाण्यासाठी रस्त्याच्‍या कामाचा शुभारंभ करण्यात आला.