शहापुरात शाळा वाचवा आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापुरात शाळा वाचवा आंदोलन
शहापुरात शाळा वाचवा आंदोलन

शहापुरात शाळा वाचवा आंदोलन

sakal_logo
By

शहापूर, ता. ८ (बातमीदार) : शहापूर तालुक्यातील १०० पेक्षा जास्त जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया व स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया शहापूर तालुका कमिटी या संघटनेने पंचायत समितीवर शाळा वाचवा आंदोलन व मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी ग्रामीण आणि दुर्गम भागांतील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
या शाळा वाचवा आंदोलनात संघटनेने गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लेखी निवेदन देऊन चर्चा केली. राज्यात मागील काही दिवसांपासून शाळा बंद करण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. त्याअनुषंगाने २० पेक्षा कमी पटसंख्या हे कारण पुढे करून ग्रामीण आणि दुर्गम भागांतील मराठी शाळा बंद केल्या जाणार आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक आहेत. हा शाळा बंद करण्याचा निर्णय ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची दारे बंद करण्याचा एक भाग आहे. त्यातून विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण घेतानाच बाहेर फेकले जाईल. तसेच मुलींसाठी शिक्षण कायमचे दूर जाईल, असे अनेक धोके निर्माण होतील असे निवेदनात म्हटले आहे. या वेळी संघटनेचे नितीन काकरा, भास्कर म्हसे, आनंद रोज, राहुल वळंबा आदी पदाधिकारी व विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.