‘लोकधारा प्रतिष्ठान’च्या वतीने विद्यार्थी दिन साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘लोकधारा प्रतिष्ठान’च्या वतीने विद्यार्थी दिन साजरा
‘लोकधारा प्रतिष्ठान’च्या वतीने विद्यार्थी दिन साजरा

‘लोकधारा प्रतिष्ठान’च्या वतीने विद्यार्थी दिन साजरा

sakal_logo
By

पडघा, ता. ८ (बातमीदार) : भिवंडी तालुक्यातील बोरिवली येथील एका आदिवासी वाडीत लोकधारा प्रतिष्ठानच्या वतीने विद्यार्थी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. सातारा येथील प्रतापसिंह हायस्कूल या सरकारी शाळेत ७ नोव्हेंबर १९०० रोजी राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शाळेच्या पहिल्या दिवसाची नोंद झाली आहे. २०१७ पासून राज्यभर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा केला जावा, असा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. त्यानुसार ७ नोव्हेंबर २०२२ रोजी भिवंडी तालुक्यातील पडघा-बोरिवली आनंद नगर या आदिवासी वाडीत लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने ‘विद्यार्थी दिवस’ कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी उपस्थित लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टचे अध्यक्ष मिलिंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते पंकज भोईर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित माहिती विद्यार्थ्यांना देऊन शिक्षणाविषयी जनजागृती केली. यावेळी लोकधारा प्रतिष्ठान ट्रस्टच्या वतीने आदिवासी वाडीतील विद्यार्थ्यांना केक व खाऊचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते संतोष दिवे, सूरज गायसमुद्रे, विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.