चॅम्पियन लीगमध्‍ये ‘शिवडी किंग’ विजयी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चॅम्पियन लीगमध्‍ये ‘शिवडी किंग’ विजयी
चॅम्पियन लीगमध्‍ये ‘शिवडी किंग’ विजयी

चॅम्पियन लीगमध्‍ये ‘शिवडी किंग’ विजयी

sakal_logo
By

शिवडी, ता. ८ (बातमीदार) ः शिवडी विभागात राहणाऱ्या क्रिकेटपटूंसाठी रामटेकडी येथील बाल विकास मनोरंजन मैदानावर सोमवारी (ता. ७) ‘शिवडी चॅम्पियन लीग’ क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या क्रिकेट स्पर्धेमध्ये १०६ प्रतिभावंत खेळाडूंनी भाग घेतला होता. एकूण आठ संघांमध्ये ही स्पर्धा विभागून खेळण्यात आली. या स्पर्धेमध्ये अंतिम विजेता संघ ठरला तो शिवडी किंग. या संघाला आयोजकांच्या वतीने रोख पारितोषिक, ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी माजी नगरसेवक सचिन पडवळ आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.