मुलीचा वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीचा वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये साजरा
मुलीचा वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये साजरा

मुलीचा वाढदिवस अनाथ आश्रमामध्ये साजरा

sakal_logo
By

डोंबिवली, ता. ८ (बातमीदार) : कल्याण येथील रुही सावंत हिचा वाढदिवस तिचे वडील भावेश आणि आई अंकिता सावंत यांनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला. कल्याणमधील मैत्रकुल या अनाथ आश्रमामध्‍ये तेथील विद्यार्थ्यांसोबत वाढदिवस साजरा करताना आश्रमात लागणारा महिन्याचा शिधा, मिठाई, चॉकलेट, फटाक्‍यांचे वाटप करण्‍यात आले. तसेच, यानिमित्ताने सावंत परिवाराने मित्रमंडळींना आवाहन करून आश्रमासाठी आणखी मदत मिळावी म्हणून भारतीय रेल्वेचे अधिकारी शशिकांत शेलार, नीलेश अंबावले, विद्या अंबावले, प्रदीप पाटील, सिद्धी, आदित्य, अर्णव यांच्यातर्फे आणखी मदत देऊन आश्रमातील मुलांना आधार दिला.