खाडी किनाऱ्यावर जैविक कचरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खाडी किनाऱ्यावर जैविक कचरा
खाडी किनाऱ्यावर जैविक कचरा

खाडी किनाऱ्यावर जैविक कचरा

sakal_logo
By

कामोठे, ता. ८ (बातमीदार) : कांदळवन क्षेत्रात अनधिकृत बांधकामांसाठी कांदळवन नष्ट करण्याचे प्रकार यापूर्वी झाले आहेत. अशातच कामोठे, सेक्टर ३६ मधील खाडीकिनाऱ्यावरील कांदळवनात मेडिकल बायो वेस्ट टाकण्याचे प्रकारदेखील समोर येत आहेत. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून अशा या प्रकारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
डेब्रिज, घरगुती कचरा, मासेमारीसाठी बांध टाकून खाडीचे पाणी अडवल्यामुळे कांदळवन क्षेत्र कमी होत आहे. कांदळवनाचे जतन करण्यासाठी कामोठेतील कांदळवन संरक्षण समिती, मॅन्ग्रोव्ह सोल्जर संघटनेने रविवारी (ता. ६) कामोठे, सेक्टर ३६ मध्ये खाडीकिनारी स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत राजकीय, सामाजिक क्षेत्रातील लोक सहभागी झाले होते; पण या मोहिमेवेळी मोठ्या प्रमाणात मेडिकल बायो वेस्ट तसेच तारीख संपलेल्या खाद्यपदार्थांची बंद पाकिटे सापडली आहेत. कामोठे तसेच आजूबाजूच्या शहरातील दवाखाने, खाद्यपदार्थांची विक्री करणारे दुकानांमधून हा कचरा खाडीत फेकला जात असल्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे महापालिकेने याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी मॅन्ग्रोव्ह सोल्जर संघटनेने केली आहे.
़़़़़़़़़़़़़़़़़़-------------------------------------
महापालिका क्षेत्रातील मेडिकल बायो वेस्ट वेळेवर उचलला जात नाही. नदी, खाडीपात्रात प्रदूषण वाढले आहे. याकडे प्रदूषण मंडळाचे सतत दुर्लक्ष होत आहे. महापालिका, वन विभाग यांनी कांदळवन जागेत प्रदूषण करणारे व्यक्ती, संस्था यांच्याविरोधात कडक कारवाई करण्याची गरज आहे.
- डॉ. अरुणकुमार भगत, माजी नगरसेवक, कामोठे