साई वल्ड सिटीच्या सदनिका ग्राहकांना सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साई वल्ड सिटीच्या सदनिका ग्राहकांना सुपूर्द
साई वल्ड सिटीच्या सदनिका ग्राहकांना सुपूर्द

साई वल्ड सिटीच्या सदनिका ग्राहकांना सुपूर्द

sakal_logo
By

कामोठे, ता. ७ (बातमीदार) : नवी मुंबईतील नामांकित बांधकाम व्यावसायिक पॅराडाईज ग्रुपच्या पळस्पे येथील साई वर्ल्ड सिटी फेज- १ च्या ८०० भाग्यवान सदनिकाधारकांना घराची चावी देण्याचा समारंभ दिमाखात पार पडला. त्यानिमित्ताने आयोजित कार्निव्हलचा नागरिकांनी आनंद घेतला.

पॅराडाईज ग्रुपने बांधकाम क्षेत्रात नावलौकिक कमावला आहे. घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना वेळेवर घराचा ताबा देणे हे ग्रुपचे वैशिष्ट्य आहे. पॅराडाईज ग्रुपने पनवेलजवळील पळस्पे येथे ३२ एकरांच्या मेगा टाऊनशिपचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. शनिवारी (ता. ५) साई वर्ल्ड सिटीमधील रहिवाशांना ८०० कॉस्मो- लक्झरी घरे सुपूर्द करण्यात आली. साई वर्ल्ड सिटीमध्ये विस्तृत हिरवे श्रेत्र, थीम असलेली लँडस्केपिंग आणि थीम असलेल्या जगात सुशोभित केलेल्या आरोग्य, मनोरंजन आणि आरामशीर जीवनशैलीच्या सुविधा उपलब्ध आहेत. ५ मजली क्लब वेगास हे ४५ हजार चौरस फुटांमध्ये पसरलेले आहे. शनिवारी साई वर्ल्ड सिटीचा पहिला टप्पा पूर्ण झाल्याबद्दल मोठ्या दिमाखात कार्निव्हल साजरा करण्यात आला. ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी साजरा केलेल्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय नर्तकांनी, गायकांनी नागरिकांचे मनोरंजन केले. राजकीय, बांधकाम क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कार्निव्हलला भेट दिली. प्रतिक्रिया-नवी मुंबईतील पहिला थीमवर आधारित गृहनिर्माण प्रकल्प आहे. बँकेचे कर्ज न घेता घर विकत घेणाऱ्या रहिवाशांच्या विश्वासाच्या जोरावर नवी मुंबईतील मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभा राहिला आहे, असे पॅराडाईज ग्रुपचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक मनीष भतिजा म्हणाले.