नवी मुंबईतील बांधकामांसाठी सरकारी समिती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नवी मुंबईतील बांधकामांसाठी सरकारी समिती
नवी मुंबईतील बांधकामांसाठी सरकारी समिती

नवी मुंबईतील बांधकामांसाठी सरकारी समिती

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : नवी मुंबईतील खासगी व शासकीय बांधकामे तसेच विकासकामे आदींची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने शासकीय व बांधकाम तज्ज्ञांची समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये माजी मुख्य सचिव, प्रधान सचिव (नगरविकास), सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक आणि क्रेडाई एमसीएचआयचे प्रतिनिधी यांचा समावेश आहे. विकासादरम्यान उद्‌भवणाऱ्या कोणत्याही समस्येवर ही समिती उपाय सुचवेल.
सिडकोने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नवी मुंबई मेट्रो, नैना, कॉर्पोरेट पार्क इत्यादींसह विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प तयार करण्यासाठी सिडकोने विकसकांना भाडेतत्त्वावर जमीन दिली आहे. त्याच वेळी या भूखंडांवर आणि लगतच्या भागात नागरी सुविधांसह आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याची जबाबदारीही सिडकोची आहे. यासंदर्भात ही समिती समन्वय साधेल. राजेश प्रजापती आणि आर. केवल वलंभिया या समितीचे सदस्य आहेत.
याबाबत राजेश प्रजापती म्हणाले, की ‘मूलभूत पायाभूत सुविधांना उशीर झाल्यामुळे अनेक प्रकल्पांना विलंब झाला. अतिरिक्त लीज प्रीमियममध्ये मोठी वाढ झाल्याने घर खरेदीदारांवर परिणाम होत आहे. या निर्णयामुळे विविध रखडलेले प्रकल्प पुन्हा सुरू होण्यास मदत होईल व खरेदीदारांना ताबा देण्याचा मार्ग मोकळा होईल.’

समितीमुळे कामकाजात अधिक पारदर्शकता येईल. विविध प्रकल्पांना गती मिळण्यास मदत होईल आणि नवी मुंबई आणि लगतच्या परिसरातील जलद विकासाचा मार्ग मोकळा होईल.
- डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, सिडको

विकासकांनी विविध ठिकाणचे त्यांचे प्रकल्प वेळेत पूर्ण केले असूनही रस्ते, पाणी आणि इतर मूलभूत सुविधांना वेळ लागतो. तसेच ओसी मंजुरीला विलंब होतो. या समितीच्या स्थापनेमुळे या समस्या त्वरेने सोडवल्या जातील.
- बोमन इराणी, अध्यक्ष, क्रेडाई एमसीएचआय