कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न
कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

कॅरम स्पर्धा उत्साहात संपन्न

sakal_logo
By

नेरूळ, ता. ८ (बातमीदार) ः जुईनगर येथे दोनदिवसीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे नवी मुंबईचे महामंत्री डॉ. राजेश पाटील आणि नगरसेवक काशिनाथ पाटील यांच्यातर्फे हे आयोजन करण्यात आले होते. यात विविध भागातून खेळाडू सहभागी झाले होते. महिला खेळाडूंचाही सहभाग लक्षणीय होता, असे आयोजकांनी सांगितले.

या स्पर्धेच्या उद्घाटन शनिवारी (ता. ५) बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे आणि रामचंद्र घरत यांच्या हस्ते करण्यात आले होते. सर्व खेळाडूंना एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, कलागुणांना वाव मिळावा म्हणून हे व्यासपीठ महत्त्वाचे आहे, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले. रविवारी (ता. ६) सायंकाळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. याव वेळी समाजसेवक जयेंद्र अरुण सुतार, नरेश सुतार, हनुमंत रोडे, मुख्याध्यापिका चौधरी, अरुणा भोइर, सुनीता नाईक, मंगल बडे, नीलम, अनिता पाटील, संदीप पाटील, संतोष घरत, महेश घरत, जयेश धुमाळ, किरण परब व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.