विद्युत खांबासाठी निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युत खांबासाठी निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण
विद्युत खांबासाठी निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण

विद्युत खांबासाठी निकृष्ट दर्जाचे काँक्रिटीकरण

sakal_logo
By

नेरूळ, ता. ८ (बातमीदार) ः नवी मुंबईत सर्वत्र नव्या पद्धतीने विद्युत खांब लावले जात आहेत; मात्र हे खांब बसवताना योग्य काळजी न घेतल्याचे दिसून येत आहे. अग्रोळी गावाजवळ खांब बसवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या काँक्रिटीकरण फाऊंडेशनमध्ये निकृष्ट दर्जाचे काम आढळल्याची तक्रार अलर्ट सिटिजन फोरम नवी मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते सुधीर दानी यांनी आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबईतील विद्युत खांब बसवण्यासाठी आयआयटीसारख्या यंत्रणेकडून स्ट्रक्चर ऑडिट करून निर्णय घ्यावा असे सर्वांचे मत होते, पण प्रशासनाकडून सर्वच विद्युत खांब बदलले जात आहेत. या विद्युत खांबांचे फाऊंडेशन करताना दर्जाकडे कानाडोळा करत असल्याची तक्रार नागरिक करत आहेत. फाऊंडेशनमध्ये रेडीमिक्स टँकरमधून योग्य दर्जाचे काँक्रीट वापरले जात नसल्याचे उघड झाले आहे. रेडीमिक्स मटेरियल हे दोन तासांत वापरणे अभियांत्रिकीय दृष्टीने अनिवार्य असते. जसा जसा विलंब होईल तशी तशी रेडीमिक्स ट्रेंड कमी होते असे म्हटले जाते, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. बेलापूर परिसरात एका ठिकाणी रेडिमिक्स मटेरियलमध्ये खडी आणि सिमेंटचे केवळ पाणी असल्याचे दिसून आले आहे. येथे पालिकेच्या विद्युत विभागाचा कोणीही कर्मचारी व अधिकारी उपस्थित नसल्याचे चित्र आहे.