वसईत राष्ट्रवादीचे सत्तार यांच्या विरोधात आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वसईत राष्ट्रवादीचे सत्तार यांच्या विरोधात आंदोलन
वसईत राष्ट्रवादीचे सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

वसईत राष्ट्रवादीचे सत्तार यांच्या विरोधात आंदोलन

sakal_logo
By

वसई, ता. ८ (बातमीदार) : अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे वसई विरार शहरात पडसाद उमटले आहेत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या छायाचित्राला जोडे मारून निषेध व्यक्त करत त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वसई विरार शहर जिल्ह्यातर्फे जिल्हाध्यक्ष राजाराम मुळीक यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन वसईत करण्यात आले. या वेळी राष्ट्रवादी महिला आघाडी, युवती सेल, विद्यार्थी काँग्रेस, सामाजिक न्याय विभाग, ओबीसी विभागाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महिलांविषयी बेताल वक्तव्य करणारे मंत्रिमंडळात कसे काय राहतात. जोपर्यंत सरकार त्यांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अशी आंदोलने होतच राहणार, असे यावेळी मुळीक यांनी सांगितले.
----------------
पालघरमध्येही निषेध
पालघर (बातमीदार) : अब्दुल सत्तार यांच्या विधानाच्या निषेधार्थ पालघरमध्ये तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हुतात्मा चौकात आंदोलन केले. या वेळी पालघर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.