बससेवा बंद केल्याने रास्ता रोकोचा इशारा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बससेवा बंद केल्याने रास्ता रोकोचा इशारा
बससेवा बंद केल्याने रास्ता रोकोचा इशारा

बससेवा बंद केल्याने रास्ता रोकोचा इशारा

sakal_logo
By

मोखाडा, ता. ८ (बातमीदार) : पालघर-वाडा-देवगांव या राज्यमार्गावर वाडा-खोडाळा दरम्यान ओगदा गावाजवळ रस्त्याला भगदाड पडले आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यायी रस्ता सुरू करून दिला आहे. सध्यस्थितीत येथून हलक्या व अवजड या सर्व वाहनांची वाहतूक सुरळीत सुरू आहे. या राज्यमार्गावर पालघर व वाडा आगाराच्या औरंगाबाद, नंदुरबार, अक्कलकुवा, शिर्डी व मोरचोंडी ह्या लांब पल्ल्याच्या बससेवा आहेत; मात्र कोणतीही पूर्वसूचना न देता या बससेवा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळ आणि बांधकाम विभागाच्या टोलवाटोलवीमुळे या मार्गावरील सर्व बससेवा बंद झाल्या आहेत. या बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास खोडाळा चौफुलीवर सोमवारी (ता. १४) रास्ता रोको करण्याचा ईशारा प्रवासी हितवर्धक संघाने दिला आहे.
पालघर-वाडा-देवगाव हा राज्यमार्ग मुंबई-आग्रा आणि मुंबई -अहमदाबाद या राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा मधला पर्यायी मार्ग आहे. या मार्गावरून पालघरला जिल्ह्याच्या ठिकाणी व न्यायालयीन तसेच अन्य कामांसाठी ठाणे येथे जाणे सोयीचे आहे. या राज्यमार्गावर वाडा-खोडाळा दरम्यान ओगदा गावाजवळ रस्त्याला भगदाड पडले आहे. त्यामुळे या मार्गावरील बससेवा महिनाभरापासून बंद करण्यात आली आहे. या मार्गावरील बससेवा पूर्ववत सुरू न झाल्यास खोडाळ्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (ता. १४) रास्ता रोको आंदोलन करण्याचे पत्र प्रवासी हितवर्धक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब मुळे यांनी मोखाडा तहसीलदारांना दिले आहे.