केळवे ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा शुभारंभ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केळवे ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा शुभारंभ
केळवे ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा शुभारंभ

केळवे ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा शुभारंभ

sakal_logo
By

पालघर, ता. ८ (बातमीदार) : केळवे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील विकासकामांचा शुभारंभ सरपंच संदीप किणी यांच्या हस्ते करण्यात आला. केळवे ग्रामपंचायतचे नूतन सरपंच संदीप किणी यांनी निवडून आल्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी ग्रामविकास अधिकारी दिनकर मोडवे, उपसरपंच राजेश सालकर, सदस्य रोसिन शेख, सूरज उंबरसाडा प्रतीक्षा पालवा, कल्पना राऊत, जितेश पाटील व ग्रामस्थ हर्षल पाटील, महेंद्र मोहनकर, सलीम शेख, अरुण पाटील, आदी उपस्थित होते. गावातील स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यासाठी मांगेलआली, बारी वाडा येथे घनकचऱ्याचा ढीग जमा झालेला होता. मजूर व यांत्रिक सामग्रीचा वापर करून स्वच्छता मोहीम हाती घेतली व सर्व घनकचऱ्याची विल्हेवाट लावली. तसेच गावामध्ये विद्युत दिवे लावण्यात आले आहेत.