रोहा येथे सत्तार यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोहा येथे सत्तार यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा
रोहा येथे सत्तार यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

रोहा येथे सत्तार यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

sakal_logo
By

रोहा, ता. ८ (बातमीदार) ः कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची प्रेतयात्रा काढून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रोहा येथे निषेध नोंदवण्यात आला. पोलिसांनी अब्दुल सत्तार यांचा पुतळा ताब्यात घेतला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले होते. या वेळी आमदार आदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे उपस्थित होते. सत्तार यांच्याविरोधात गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

या वेळी आमदार आदिती तटकरे म्हणाल्या, की अब्दुल सत्तार यांनी बेताल वक्तव्य केले आहे. याचा महिला वर्गातून निषेध व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आक्षेपार्ह शब्द वापरून त्यांनी समस्त महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे सत्तार यांचा राजीनामा घेऊन त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी. त्याचप्रमाणे अनिकेत तटकरे म्हणाले, की लोकाशाही मार्गाने संसदेत निवडून गेलेल्या महिला नेत्याबद्दल अब्दुल सत्तार यांनी बेताल वक्तव्य केले आहे. याचा मी निषेध करतो. आपण लोकप्रतिनिधी असल्याचे भान त्यांना राहिले नाही. पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा.
या वेळी जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे, तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर, माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, शहार अध्यक्ष अमित उकडे, माजी नगरसेवक अहमद दर्जी, महेश कोलटकर, राजू जैन, मयूर दिवेकर, महेंद्र गुजर, अजित मोरे, अनंत देशमुख, अनिल भगत, राकेश शिंदे, रामचंद्र सकपाळ, जितेंद्र पडवळ, महिला अध्यक्षा प्रीतम पाटील, स्नेहा ताडकर, अनिषा शिंदे, शिल्पा धोत्रे, मजीद पठाण, महेश बामुगडे, सागर भोबड, आसावरी मोकळ, सतेज आपणकर, सतीश भगत आदी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.