दक्षता सोसायटीची म्हाडा अधिकाऱ्यांकडून पाहणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षता सोसायटीची म्हाडा अधिकाऱ्यांकडून पाहणी
दक्षता सोसायटीची म्हाडा अधिकाऱ्यांकडून पाहणी

दक्षता सोसायटीची म्हाडा अधिकाऱ्यांकडून पाहणी

sakal_logo
By

घाटकोपर, ता. ८ (बातमीदार) ः घाटकोपर पूर्वेतील रमाबाई आंबेडकर नगरातील पोलिसांच्या दक्षता हौसिंग सोसायटीतील अनेक इमारतींमध्‍ये छताचे प्‍लास्‍टर कोसळण्याच्या दुर्घटना वारंवार घडत आहेत. गेल्या वर्षभरात येथील रहिवासी पालिका आणि म्हाडाकडे स्थलांतरासाठी याचना करत होते; मात्र याकडे कोणाचेही लक्ष गेले नव्हते; मात्र तीन दिवसांपूर्वी एका घराचे छत कोसळून दोघेजण गंभीर जखमी झाल्यानंतर पालिका आणि म्हाडाला अखेर जाग आली. येथील इमारतींची पाहणी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे.
दक्षता सोसायटीतील इमारतींचे छताचे प्‍लास्‍टर कोसळण्याच्या घटना रोजच घडत आहेत. या आठवड्यात अशा तीन घटना घडल्या; तर गेल्या वर्षभरात तब्बल १२ दुर्घटना घडल्याचे रहिवासी सांगतात. तीन दिवसांपूर्वीच्या दुर्घटनेत येथील गोदावरी क्रमांक १ या इमारतीतील एका रूमचे छत कोसळून त्यात ज्योती म्हसणे आणि मानव शाह हे जखमी झाले. त्यांच्यावर पालिकेच्या राजावाडी रुग्णालयात उपचार करण्यात आले; मात्र या दुर्घटनेनंतर येथील पोलिस पत्नींनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता दुर्घटना घडली त्या वेळीच पालिका अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली; तर आता म्हाडाच्या अधिकाऱ्यांनीही येथील इमारतींची पाहणी केली.

अहवालानंतर निर्णय
पाहणीचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात येणार असून, त्यानंतर येथील रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती पाहणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दिल्‍याचे दक्षता सोसायटीतील पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मागील आठवड्यात गणेश बिल्डिंगमधील रूम नंबर आठमध्ये बाळासाहेब काकड यांच्या या रूममधील स्लॅब कोसळले होते. आता म्हाडा अधिकाऱ्यांनी पाहणी केली असून, त्याबाबतच्या अहवालानुसार काय निर्णय घेतला जातो याकडे आमचे डोळे लागले आहेत.
- दशरथ आव्हाड व अजय बोडके, पदाधिकारी दक्षता सोसायटी