आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेना अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेना अभिवादन
आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेना अभिवादन

आद्यक्रांतीकारक राघोजी भांगरेना अभिवादन

sakal_logo
By

मोखाडा, ता. ८ (बातमीदार) : आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरे यांच्या जयंतीनिमित्त मोखाडा तालुक्यात विविध ठिकाणी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आले. खोडाळा ग्रामपंचायत कार्यालय, वाकडपाडा तसेच अन्य गावांमध्ये राघोजी भांगरेंना अभिवादन करण्यात आले आहे. यावेळी खोडाळा ग्रामपंचायतच्या सरपंच कविता पाटील, उपसरपंच उमेश येलमामे, ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रफुल्ल खैरनार, माजी सरपंच प्रभाकर पाटील, पोलिस पाटील भारती पालवे, संजय साळवे, अनंता ईधे, उमाकांत हमरे यांसह नागरिक उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे संजय साळवे, प्रफुल्ल खैरनार यांनी राघोजी भांगरेंचा जीवनपट उलगडत त्यांच्या कार्याची माहिती सांगितली.
......
मोखाडा : खोडाळा ग्रामपंचायत कार्यालयात आद्य क्रांतीकारक राघोजी भांगरेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करताना सरपंच कविता पाटील.