अंबरनाथला राष्ट्रवादीची निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबरनाथला राष्ट्रवादीची निदर्शने
अंबरनाथला राष्ट्रवादीची निदर्शने

अंबरनाथला राष्ट्रवादीची निदर्शने

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. ८ (बातमीदार) : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याच्या निषेधार्थ अंबरनाथमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मंगळवारी घोषणाबाजी करून निदर्शने करण्यात आली. शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया मंगळवारी सकाळी शहराध्यक्ष सदाशिव पाटील व महिला शहराध्यक्ष पुनम शेलार यांच्या नेतृत्त्वाखाली अंबरनाथ पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मंत्री सत्तार यांच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन करत जाहीर निषेध करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे, महिला जिल्हाध्यक्ष विद्याताई वेखंडे, प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे, महिला प्रदेश सरचिटणीस प्रिसिला डिसिल्वा, माजी युवक जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, गणेश गायकवाड, युवक अध्यक्ष प्रमोद बोराडे, युवती अध्यक्ष गौतमी सूर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.