कल्याणमध्येही राष्ट्रवादीकडून ठिय्या आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कल्याणमध्येही राष्ट्रवादीकडून ठिय्या आंदोलन
कल्याणमध्येही राष्ट्रवादीकडून ठिय्या आंदोलन

कल्याणमध्येही राष्ट्रवादीकडून ठिय्या आंदोलन

sakal_logo
By

कल्याण, ता. ८ (बातमीदार) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासंदर्भात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी काढलेल्या अपशब्दावरून कल्याणमध्येही रास्ता रोको आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. कृषिमंत्री अब्दुल सत्तार हाय हाय, पन्नास खोके यांच्यासह माफीनामा नको राजीनामा पाहीजे, आदी घोषणा यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून दिल्या जात होत्या. निदर्शने करणाऱ्या महिला कार्यकर्त्या अचानक आक्रमक झाल्या आणि त्यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज चौकातील रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीच्या इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही रस्त्यावर ठाण मांडत रास्ता रोकोचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना बाजूला करत रस्ता मोकळा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, महिला जिल्हाध्यक्ष सारिका गायकवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.