संस्थेच्या अधिकाऱ्याने ४० कर्जदारांची केली फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संस्थेच्या अधिकाऱ्याने ४० कर्जदारांची केली फसवणूक
संस्थेच्या अधिकाऱ्याने ४० कर्जदारांची केली फसवणूक

संस्थेच्या अधिकाऱ्याने ४० कर्जदारांची केली फसवणूक

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. ८ : डोंबिवलीतील सारथी फायनान्स कन्सल्‍टन्सी कंपनीत कार्यरत असलेल्या असिस्टंट ब्रॅंच मॅनेजरने ४० कर्जदारांची एक लाख ८४ हजाराला फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. संस्थेकडून कर्ज घेतलेल्या कर्जदारांचे हप्ते संस्थेतील सहायक शाखा व्यवस्थापक रुपावली करसन यांनी संस्थेच्या खात्याऐवजी स्वतःच्या खात्यावर भरणा करून घेतले. कर्जदार आणि सारथी फायनान्स वित्तीय संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी संस्थेच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात रूपावली यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली पूर्वेला सारथी फायनान्स कन्सल्‍टन्सी कंपनी आहे. या शाखेत कार्यरत असणारे शाखा व्यवस्थापक धम्मपाल मगरे यांच्या तक्रारीवरून रामनगर पोलिस ठाण्यात सहायक शाखा व्यवस्थापक रूपावली करसन यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.