महालक्ष्मी उड्डाणपुलावर कारचा अपघात; चालक गंभीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महालक्ष्मी उड्डाणपुलावर कारचा अपघात; चालक गंभीर
महालक्ष्मी उड्डाणपुलावर कारचा अपघात; चालक गंभीर

महालक्ष्मी उड्डाणपुलावर कारचा अपघात; चालक गंभीर

sakal_logo
By

कासा, ता. ८ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर मंगळवारी महालक्ष्मी उड्डाणपुलावर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणाऱ्या कारचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजकाला धडकली. यात कारचे नुकसान झाले असून कार चालक विशाल गोहील (वय : २४, रा. मुंबई) हा गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कासा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी जखमी विशाल याला कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण गंभीर जखमी झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात पाठविण्यात आले.