ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तूत्य उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तूत्य उपक्रम
ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तूत्य उपक्रम

ज्येष्ठ नागरिक संघाचा स्तूत्य उपक्रम

sakal_logo
By

मुलुंड, ता. ८ (बातमीदार) ः साने गुरुजी ज्येष्ठ नागरिक मित्र मंडळ, कळवा खारेगांव हा कट्टा ज्येष्ठ नागरिक कट्टा म्हणून प्रसिद्ध आहे. या संघातर्फे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. याच अनुषंगाने रविवारी (ता. ६) या कट्ट्यावर संगमेश्वर येथील दिलीप जाधव यांचा ज्येष्ठ नागरिकांच्या तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक मनोहर सुर्वे, नेहा माने, स्मिता बने यादेखील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ ग्रामस्थ रामचंद्र साळवी होते. पाहुण्यांचे स्वागत मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रकाश परब उपाध्यक्ष नारायण डोंगरे व सचिव महादेव नाईक यांनी केले. रोज सकाळी या मंडळातर्फे ओमकार, साने गुरुजी प्रार्थना, सुविचार, दिनविशेष, ज्ञानेश्वरी अध्याय वाचन व निरूपण, अभंग, भक्तिगीते व मनोगते आदी कार्यक्रम होतात; तर दर शनिवारी हरिपाठ सभासदांचे वाढदिवस व वर्षातून दोनदा सहलीचे आयोजन करण्यात येते.