प्रकाशदायक वातावरण ठरतय अपघाताचे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रकाशदायक वातावरण ठरतय अपघाताचे कारण
प्रकाशदायक वातावरण ठरतय अपघाताचे कारण

प्रकाशदायक वातावरण ठरतय अपघाताचे कारण

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. ९ ः खासगी आणि सार्वजनिक प्रवासी, मालवाहतूक वाहनांच्या खरेदीचे प्रमाण जसजसे वाढत आहे, त्याचप्रमाणे अपघातांची संख्यासुद्धा झपाट्याने वाढत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून निश्चित स्थळी पोहचण्याची घाई वाहनचालकांसाठी जीवघेणी ठरत आहे. गेल्या वर्षभरात २९ हजार ४७७ जीवघेण्या अपघातांमध्ये १३ हजार ५२८ नागरिकांना जीव गमवाला लागला आहे. ज्यामध्ये सर्वाधिक अपघात प्रकाशदायक वातावरणात झाले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
बऱ्याच वेळा पावसात, धुक्यांमध्ये किंवा गारा पडत असताना वाहनचालकांनी वाहन चालवू नये, असे सांगितले जाते. त्याप्रमाणे अशा परिस्थितीमध्ये सर्वाधिक वाहनचालक वाहन चालवणे टाळतात, वातावरण उघडण्याची वाट बघीतली जाते. मात्र, शुद्ध प्रकाशदायक वातावरणात वाहन चालक शक्यतो कुठेही न थांबता निश्चित ठिकाणी पोहचण्यासाठी सतत वाहन चालवत असल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा वातावरणातच सर्वाधिक अपघात घडून येत असल्याचे राज्य महामार्ग पोलिस विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

अपघापांची आकडेवारी
प्रकाशदायक वातावरणात गेल्या वर्षी एकूण २७ हजार २५१ अपघात झाले असून त्‍यात १२ हजार ६७२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याप्रमाणेच पावसाळ्यात १,६६१ अपघातांत ६४२, धुके असलेल्या वातावरणात ५२४ अपघातांत २०२, गारांचा पाऊस पडत असताना ४१ अपघातांत १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये एकूणच २९ हजार ४७७ अपघातांमध्ये १३ हजार ५२८ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.