विलेपार्लेत भंगार वाहनांना आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विलेपार्लेत भंगार वाहनांना आग
विलेपार्लेत भंगार वाहनांना आग

विलेपार्लेत भंगार वाहनांना आग

sakal_logo
By

मुंबई, ता. ८ : विलेपार्ले येथील पश्चिम द्रुतगती महामार्ग उड्डाणपुलाखाली ठेवलेल्या भंगारवस्तू आणि टाकाऊ वाहनांना मंगळवारी आग लागल्याची घटना घडली. या आगीत कोणीही जखमी झाले नाही. सहारा हॉटेलजवळ अंधेरी-विलेपार्ले उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या काही भंगार वाहनांना दुपारी ४ च्या सुमारास आग लागली. अग्निशमन दलाला याची माहिती मिळाल्यानंतर एक बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाला. जवानांनी १५ मिनिटांत ही आग आटोक्यात आली. आगीचा धूर उड्डाणपुलावर गेल्याने पश्चिम द्रुतगती महामार्गावर काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती.